नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सेवानिवृत्त बटालियन अधिका- याची करोडोंची बेहिशोबी मालमत्ता जप्त. – पुणे लाचलुचपत विभागाची कारवाई.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे

कोल्हापूर:- सेवानिवृत्त लोकसेवक खुशाल विठठल सपकाळे, तत्कालीन समादेशक भारत राखीव बटालियन क.३ कोल्हापूर, (सेवानिवृत्त), रा. मरोशी भवानीनगर, प्लॉट नं. झेड ३ डॅफोडील्स बिल्डींग प्लॅट नं. ३०४ मरोळ मुंबई व त्यांची पत्नी यांचेविरूध्द अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकसेवक खुशाल विठठल सपकाळे, तत्कालीन समादेशक भारत रासीव बटालियन क्र. ३ कोल्हापूर, (सेवानिवृत्त), रा.मरोशी भवानीनगर, प्लॉट नं. झेड ३ डॅफोडील्स बिल्डींग प्लॅट नं.३०४ मरोळ मुंबई यांचेविरुध्द लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेनंतर त्यांचे निवासस्थानाची घरझडती घेण्यात आली होती. त्यावरून आरोपी सेवानिवृत्त लोकसेवक खुशाल सपकाळे यांचे मालमत्तेची उघड चौकशी करणेबाबत पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्यान ब्युरो, पुणे यांचेकडुन आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे आरोपी सेवानिवृत्त लोकसेवक खुशाल विठठल सपकाळे, तत्कालीन समादेशक भारत राखीव बटालियन क. ३ कोल्हापूर, यांचे मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये आणि त्यांचे कुटूंबियांचे नावे ज्ञात उत्पन्नाचे स्त्रोतापेक्षा एकुण१,६६,३३,९९१ रुपये अपसंपदा (बेहिशेबी मालमत्ता संपादित) केली असुन त्यांचे प्रमाण ७५.९८% निष्पन्न झाले आहे. खुशाल विठठल सपकाळे यांनी व त्यांचे कुटूंबियांनी वर नमुदप्रमाणे अपसंपदा धारण केल्याने त्यांची पत्नी हेमांगी खुशाल सपकाळे यांचे विरूध्य भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम १३ (१) (ई) सह १३(२) सह भा.दं. वि.सं. कलम १०९ प्रमाणे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षीका वैष्णवी पाटील कोल्हापूर यांनी सदरची चौकशी पूर्ण करून सरकार तर्फे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती प्रक्रिया सुरू आहे.शाहुपूरी पोलीस ठाणे कोल्हापूर गु.र.नं. ४०१/२०१८ भ्र.प्र. अधिनियम १९८८ चे कलम ७,१२,१३(१) (ड), १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:14 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!