नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चार वर्षांच्या आरववर बिबट्याचा भीषण हल्ला!

ग्रामस्थांच्या धाडसाने मृत्यूच्या जबड्यातून चिमुकल्याची सुटका; परिसरात दहशत!

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी :- रमजान मुलानी

सांगली गिरजवडे (ता. शिराळा) :
शिराळा तालुक्यातील गिरजवडे (मुळीकवाडी) येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. फक्त चार वर्षांचा चिमुकला आरव अमोल मुळीक आजोबांसोबत शेतात गेला आणि क्षणात बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरला! झाडाच्या आड दडलेल्या बिबट्याने वीजेच्या वेगाने आरववर झडप घालत त्याला उसाच्या शेतात फरपटत नेले.

परंतु गावातील ग्रामस्थांनी दाखवलेल्या असामान्य धाडसामुळे हा चिमुकला मृत्यूच्या जबड्यातून सुटला!
काशिनाथ मुळीक यांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या दिशेने धावत जात त्याला हुसकावून लावले आणि आरवची सुटका केली. त्यानंतर बजरंग आणि मोहन मुळीक यांनी रक्तबंबाळ अवस्थेत आरवला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉ. अनिरुद्ध काकडे आणि डॉ. मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचार करून आरवला पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये हलवले. सध्या आरवची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती समजताच सरपंच सचिन देसाई यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनअधिकारी एकनाथ पारधी, अनिल वाजे, स्वाती कोकरे, प्रा. सुशीलकुमार गायकवाड, सत्यजीत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन आरवची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, काही वेळातच त्याच बिबट्याने घागरेवाडी येथे बांधकाम स्थळाजवळ दुचाकीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांत शिराळा व शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. काही मुलांचा मृत्यू झाला असून अनेक पाळीव प्राणी ठार झाले आहेत. तरीही वनविभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

“आमचं गाव आता भयभीत झालं आहे. शेतात जाणंही धोकादायक झालंय,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वनविभागाने परिसरात सापळे लावून बिबट्याचा शोध तातडीने सुरू करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:04 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!