नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वणी पोलीस ठाण्याची धडक कामगिरी — ३.५० लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत

🚔 DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨✍️🗞️📰🗞️✍️प्रतिनिधी : योगेश गवळे

नाशिक:- वणी पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी धाडसी कारवाई करत चोरीस गेलेली काळीपिवळी मोटारकार व हिरो स्लेंडर मोटारसायकल असा एकूण ₹३,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एक संशयिताला अटक करण्यात आली आहे.
दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सुमारास पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पो.शि. दीपक गवळी व चालक पो.हवा. भगवान उदार हे देवपाडा गाव परिसरात रात्रगस्त करत असताना त्यांना एक संशयित इसम काळीपिवळी कार (क्र. MH-17-T-2043) व हिरो स्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-15-BM-2492) घेऊन संशयास्पदरीत्या जाताना दिसला.
थांबण्याचा इशारा दिल्यावर तो इसम गाडीसह पळ काढला. तत्काळ ही माहिती सपोनि. गायत्री जाधव यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक हेमंत राऊत, सपोउनि. पुंडलिक बागुल, पो.हवा. विजय लोखंडे, पो.शि. संदिप बागुल व पो.हवा. भगवान उदार यांच्या पथकाने पाठलाग करून पुणेगाव येथे ट्रॅक्टर उभा करून सापळा लावला.
अखेर पहाटे ५.१० वाजता पोलिसांनी महेंद्र किरण बागुल (वय २० वर्षे, रा. बेंद्रीपाडा, ता. कळवण, जि. नाशिक) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही वाहने मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक शहर हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.
सदर आरोपी व मुद्देमाल वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून पुढील कार्यवाही मुंबईनाका पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गायत्री जाधव, पोउपनिरीक्षक गणेश कुटे, हेमंत राऊत, सपोउनि. पुंडलिक बागुल, पो.हवा. विजय लोखंडे, पो.हवा. भगवान उदार, पो.शि. दीपक गवळी, व पो.शि. संदिप बागुल यांनी केली आहे.
🔹 वणी पोलिसांच्या तत्परतेने ३.५० लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत होऊन पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवली दक्षता व चपळाई!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!