नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेकायदेशीर अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

२ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त – दोन आरोपी ताब्यात 🚓

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- रविंद्र गवळे

नंदुरबार : दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीद्वारे धडक कारवाई करत बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडून २ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काळ्या रंगाच्या होंडा मोटारसायकल (क्रमांक MH 18 CG 2563) वर दोन तरुण गांजा घेऊन शिरपूरहून शहाद्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले.
पथकाने कहाटूळ फाटा परिसरात सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनावरील इसमांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे संतोष देवसिंग पावरा (वय २०, रा. गधडदेव, ता. शिरपूर, जि. धुळे) व किरण आप्पा डामरे (वय २२, रा. मलगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी सांगितली. तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगेतून उग्र वासाचा सुका गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला.
पथकाने तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून एकूण ६ किलो ६७५ ग्रॅम गांजा आणि होंडा मोटारसायकल असा एकूण ₹२,१३,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपींवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६४/२०२५ नुसार गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम २०(ब) व २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि. मुकेश पवार, पोहेकॉ. पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पोना. विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोशि. शोएब शेख, आणि भरत उगले यांनी संयुक्तपणे केली.
👉 स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ विक्रीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:01 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!