नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गोहत्या रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा गोरक्षक स्कॉड कार्यरत — ८ गोवंश जनावरांची सुटका

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : योगेश गवळे

नाशिक: नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गोहत्या, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी “गोरक्षक स्कॉड” कार्यान्वित करण्यात आले असून, या स्कॉडच्या प्रभावी कारवाईत पवारवाडी व मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतून ८ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी विशेष आदेश देऊन गोरक्षक स्कॉडची स्थापना केली आहे. या पथकाचे उद्दिष्ट गोवंश जनावरांची चोरी, बेकायदेशीर वाहतूक, कत्तल आणि मांस विक्री रोखणे हे आहे.
मनपा अधिकारी, कर्मचारी व पोलीस दल यांच्यातील समन्वयातून हे पथक कार्यरत असून, एका अधिकाऱ्यासह चार पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांची माहिती त्वरित देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
📞 संपर्क क्रमांक:
नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष – 0253-2309715
मालेगाव नियंत्रण कक्ष – 02554-231000
गोरक्षक स्कॉड – 9067208100
पथकाने नियुक्तीनंतर केलेल्या पहिल्याच कारवाईत पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील दरेगाव शिवार आणि मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील जुना आग्रा रोड परिसरात धडक दिली. त्यावेळी शोएब खान अफजल खान (वय 26, रा. कमालपुरा, मालेगाव), आरिफ कांती (रा. गुलाब पार्क, मालेगाव – फरार), चेतन शंकर गवळी (वय 27, रा. कुलथे, ता. धुळे) आणि युसुफ चापड (रा. मालेगाव – फरार) हे विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने ८ जनावरे निर्दयतेने बांधून पिकअप वाहनातून वाहतूक करताना आढळले.
सदर प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधार) अधिनियम १९९५ चे कलम ५, ५(अ), ९ व प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ अंतर्गत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपी क्रमांक १ व ३ यांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाने जनतेला आवाहन केले आहे की, गोवंश हत्या व अवैध वाहतूक रोखण्यासाठी सहकार्य करावे आणि तत्काळ गोरक्षक स्कॉडशी संपर्क साधावा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!