नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शासकीय विद्यानिकेतन धुळेचा जिल्हा खो-खो स्पर्धेत डंका — दोन्ही वयोगटात प्रथम क्रमांक

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨🚨 प्रतिनिधी – संदिप अहिरे

धुळे: (दि. 09 ऑक्टोबर 2025) — जिल्हा क्रीडा विभाग आयोजित गरुड मैदानावर पार पडलेल्या तालुका व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शासकीय विद्यानिकेतन, धुळेच्या दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे मान पटकावले. या चमकदार विजयामुळे दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
विद्यानिकेतनच्या 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट झुंज देत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे, प्रत्येक सामन्यात संघांनी 15 आणि 19 गुणांची कमाई करत प्रतिस्पर्ध्यांना एकही गुण न देण्याची पराकाष्ठा साधली. मैदानावर दोन्ही संघांचा दबदबा स्पष्टपणे जाणवत होता.
खेळाडूंनी शिस्त, संघभावना आणि एकमेकांवरील प्रेम या गुणांचे पालन करत परंपरेला साजेशी अशी विजयश्री खेचून आणली. विजयानंतर शाळेच्या गेटपासून विजयी विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या विजयाबद्दल प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर, गृहप्रमुख प्रतिभा मेश्राम, कुलप्रमुख नेहा साळुंखे, मुख्य लिपिक संजय गरूड, मार्गदर्शक सुनिल सोनवणे, सहाय्यक गृहप्रमुख नुपेश वंजारी, माधुरी महाले, विनोद रोकडे, उपशिक्षिका वनिता पाटील, सुनिता डंबाळे, सुरेश बच्छाव, योगिता बैसाणे, सुवर्णा मोहिते, चेतन भामरे, शितल करडक, प्रकाश पवार, कुणाल दामोदर व भावना सोनवणे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शासकीय विद्यानिकेतनच्या या दुहेरी विजयाने संपूर्ण शाळेत आणि शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!