नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मनमाड पोलिसांची मोठी कामगिरी — शासकीय वाहनास ठोस मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आणि गोवंश तस्करी करणारा सराईत गुन्हेगार ‘पंखा शेख’ गुजरात राज्यातून जेरबंद!

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी योगेश गवळे

मनमाड (ता. नांदगाव) :
मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीत शासकीय वाहनास ठोस मारू

न पोलिसांच्या जीवावर बेतणारा आणि बेकायदेशीररीत्या गोवंश जनावरांची तस्करी करणारा सराईत गुन्हेगार अखेर गुजरात राज्यातून जेरबंद करण्यात आला आहे.
दि. १० मार्च २०२५ रोजी पहाटे सुमारे ५ वाजता मालेगाव नाका चौफुली, मनमाड परिसरात गोवंश जनावरे घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअप (क्र. MH-17-AG-1773) वाहनावरील चालकास पोलिसांनी चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पोलिसांच्या शासकीय वाहनास (क्र. MH-15-HU-6257) हेतुपुरस्सर दोन वेळा जोरदार धडक दिली. या धडकेत शासकीय वाहन दुभाजकावर पलटी झाले व पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पसार होत बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची वाहतूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२५ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १३२, १२१(१)(२), २८१, २९१, ३२५, ३२४(४), २४९(ब), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब)/१७७ आणि प्राण्यांवरील क्रौर्य प्रतिबंधक अधिनियम १९६० व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५अ, ११(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी सर्फरान उर्फ ‘पंखा’ जब्बार शेख (वय ३१, रा. मुस्लिम मोहल्ला, अभोणा, ता. कळवण, जि. नाशिक) हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता. तो विविध ठिकाणी वास्तव्य बदलून पोलिसांना चकवा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीरसिंग संधू यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने — पोलिस अंमलदार राकेश जाधव, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, अक्षय चौधरी, नरेंद्र कोळी तसेच तांत्रिक विभागातील हेमंत गिलबिले व प्रदीप बहीरम यांच्या सहकार्याने गुजरात राज्यातील चिखली, जि. नवसारी येथून आरोपी ‘पंखा शेख’ यास शिताफिने ताब्यात घेतले.
त्याला मनमाड शहर पोलीस ठाण्यात आणून पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. विजय मा. करे करीत आहेत.
सदर आरोपी हा गोवंश तस्करी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सराईत असून, त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण १८ गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांमध्ये अभोणा, वणी, सुरगाणा, देवळा, मालेगाव शहर व तालुका, आझादनगर, पंचवटी, घोटी आणि मनमाड अशा ठिकाणांतील गुन्ह्यांचा समावेश आहे.
त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(ब) नुसार हद्दपार प्रस्ताव क्र. ०१/२०२५ मा. उपविभागीय दंडाधिकारी, कळवण यांचेकडे सादर करण्यात आला असून, आरोपीस सुनावणीसाठी नोटीस बजावली गेली असली तरी तो अद्याप हजर झालेला नाही.
मनमाड शहर पोलिसांनी केलेल्या या अचूक गुप्त कारवाईमुळे सराईत गुन्हेगाराचा शोध लागू शकला असून, या कामगिरीचे नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!