🚨 चोरीच्या 15 मोटरसायकलींसह ₹10.25 लाखांचा मुद्देमाल जप्त!
सराईत मोटरसायकल चोरटा अक्षय शेलार जेरबंद; 10 गुन्हे उघडकीस!
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. सराईत चोरटा अक्षय राजू शेलार (वय 25, रा. इचलकरंजी) यास अटक करून त्याच्याकडून 15 चोरीच्या मोटरसायकलींसह एकूण ₹10,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईतून 10 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात वाढलेल्या वाहनचोरींचा तपास गतीमान करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार केले. पथकातील प्रविण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय शेलार हा आपल्या साथीदारासह कोल्हापूर, राजापूर व कुडाळ येथे मोटरसायकली चोरी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
शहू टोलनाका परिसरात सापळा लावून अटक
पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने शहू टोलनाका परिसरात सापळा लावून अक्षय शेलारला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तपासात उघड झाले की, त्याने साथीदार विजय गुरव (रा. शिरगाव, शाहुवाडी) याच्यासह विविध ठिकाणांहून मोटरसायकली चोरून म्हसोबा मळ, गोकुळ शिरगाव येथे कौतुक कुडेकर यांच्या घरासमोर लपवून ठेवल्या होत्या.
उघड झालेले प्रमुख गुन्हे :
पन्हाळा, शाहुवाडी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, राजापूर (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग) व निपाणी (कर्नाटक) या ठिकाणांहून चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
यामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट, हिरो स्प्लेंडर, होंडा अॅक्टीव्हा आदी विविध कंपन्यांच्या मोटरसायकलींचा समावेश आहे.
खास उल्लेखनीय म्हणजे, आरोपीकडून मिळालेल्या वाहनांपैकी काहींचे चेसिस आणि इंजिन नंबर खोडलेले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.
पोलिसांची प्रभावी कामगिरी 👏
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व मा. अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे तसेच प्रविण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, नवनाथ कदम, अमित सर्जे, संजय हुंबे, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे, सतिश सुर्यवंशी, प्रदिप पाटील, सागर चौगले, तसेच सायबर पोलीस ठाणे, वडगाव व शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी-अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने केली.
👉 या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील वाहनचोरांच्या टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



