DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨🚨 प्रतिनिधी नारायण कांबळे
कोल्हापूर : आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब आणि असहाय्य महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या एका महिलेचा आणि तिच्या तिघा साथीदारांचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एकूण ₹8,56,530 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला कारवाईसाठी मार्गदर्शन केले.
गुप्त माहितीच्या आधारे उचगाव ते गडमुडशिंगी रोडवरील साईश अपार्टमेंट येथे बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी छापा टाकला.
या कारवाईत सुजाता सचिन साळुंखे (वय 34, रा. मणेर मळा, उचगाव) ही महिला पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचे उघड झाले. तिच्या ताब्यातून मुंबई व इचलकरंजी येथील अशा दोन महिलांची सुटका करण्यात आली.
तपासादरम्यान सुजाता साळुंखे हिला सहाय्य करणारे तिघे पुरुष आरोपी —
सुमित नेमीनाथ देशमाने (वय 29, रा. कबनूर, इचलकरंजी)
लखन मोहन कांबळे (वय 36, रा. विक्रमनगर, कोल्हापूर)
तौसिफ ताजुद्दीन सुतार (वय 36, रा. विक्रमनगर, कोल्हापूर)
यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून स्विफ्ट डिझायर कार (MH-09-CM-6314), अप्पे रिक्षा (MH-09-EL-4240), रोख रक्कम ₹10,470, ५ मोबाईल हँडसेट, तसेच अन्य साहित्य असा एकूण ₹8.56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चौकशीत आरोपींनी महिलांना गाड्यांद्वारे विविध ठिकाणी नेऊन शरीरविक्रीस भाग पाडल्याचे उघड झाले. प्रत्येक ग्राहकाकडून ₹500 इतका दर घेऊन त्यातून काही हिस्सा या आरोपींकडे दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार आणि मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, हिंदुराव चरापले, पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी, अश्विन डुणूंग, उत्तम सडोलीकर, अमित मर्दाने आणि प्रज्ञा पाटील यांनी केली.
🔹 पोलीस दलाचे हे धाडसिक पाऊल महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानवी तस्करीविरोधात एक प्रभावी पाऊल ठरले आहे.



