नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर जैताणेतील जि.प. शाळा व उर्दू स्कूल येथे श्रमदानातून वृक्षारोपण कार्यक्रम साजरा.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी अकिल शहा

साक्री : दि.14 ऑक्टोंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा व जिल्हा परिषद शाळा निजामपूर जैताणेतील उर्दू शाळेत श्रमदानातून वृक्ष लागवड कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास माननीय राधिका फलफले विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे माननीय कौतिक डुमसे सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग धुळे माननीय श्रीमती सरोज मोरे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण साक्री यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सदर कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभाग साक्री कार्यालयातर्फे रवींद्र मोरे, श्रीमती उषा साळुंके श्रीमती सोनल मगरे इत्यादी कर्मचारी, निजामपूर चे उपसरपंच श्याम पवार, ग्रा. प. सदस्य ताहीर बेग मिर्झा तसेच जिल्हा परिषद शाळा निजामपूर जिल्हा परिषद शाळा जैताणे उर्दू शाळा निजामपूर येथील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण कार्यालयामार्फत आलेल्या श्रीमती उषा साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले वन्यजीवांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तर स्वरूपात संवाद साधला कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरण विषयी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!