नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सालाबादप्रमाणे दक्षिणमुखी हनुमान मंदिर कार्तिक वारी इचलकरंजी ते पंढरपूर पायी दिंडी प्रस्थान

DPT NEWS 🙏🗞️📰🗞️🙏🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- निवास गागडे

इचलकरंजी: सम्राट अशोक नगर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथून ह. भ. प. वैकुंठवासी तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर यांच्या कृपाशीर्वादाने दिंडी चालक ह. भ.प. धोंडीराम धुमाळे यांनी पायी दिंडीसाठी एकूण महिला, पुरुष अशी 125 वारकरी भक्त एकत्र आणले. सर्वप्रथम दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे ह.भ.प. दत्तात्रय चव्हाण यांची प्रस्तावना सांगता करून दिंडीच्या नियम अटी सांगून भागातील प्रमुख उपस्थितीत असलेले माजी नगरसेवक दिलीप मुथा यांच्या हस्ते आरती व श्रीफळ वाढवून दिंडीचे शुभारंभ केले. पायी दिंडी सलग दहा दिवस चालणार असून दिंडीमध्ये नाश्ता,दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण मुक्काम प्रवचन असे नियोजन केलेले आहे. शुक्रवार दिनांक 24 /10/ 25 रोजी रात्री स्वप्निल घोलप यांचे संत भोजन अंकली आयुष्य गार्डन येथे मुक्काम. शनिवार दिनांक 25 /10 /25 रोजी रात्री ह.भ.प. धोंडीराम मुधाळे यांचे प्रवचन सिद्धेवाडी – वाघमोडे रोपवाटिका येथे मुक्काम. रविवार दिनांक 26/ 10 /25 रोजी रात्री प्रमोद मिणचे संत भोजन यांच्यातर्फे श्री सुखदेव माळी कुची यांचे घरी. सोमवार दिनांक 27 /10/ 25 रोजी रात्री ह भ प धोंडीराम मुधाळे यांचे प्रवचन अमृत पाटील पेट्रोल पंप शेजारी जुनोनी मुक्काम. मंगळवार दिनांक 28 /10 /25 रोजी रात्री श्री भैरू घोडसे यांचे घरी ह.भ.प. सुभाष पाटील यांचे प्रवचन घोडसेवाडी बुधवार दिनांक 29 /10 /25 रोजी रात्री ज्ञानोबा बाजी वाघमारे संगेवाडी येथे ह भ प सुभाष पाटील यांचे प्रवचन. गुरुवार दिनांक 30 /10 /25 रोजी रात्री भक्ती मार्ग यशोदा नगर पंढरपूर ह भ प सुभाष पाटील यांचे प्रवचन. शुक्रवार दिनांक 31/ 10 /25 रोजी रात्री ह भ प धोंडीराम मुधाळे यांचे प्रवचन पंढरपूर. शनिवार दिनांक 01/ 11/25 रोजी रात्री ह भ प धोंडीराम मुधाळे यांचे प्रवचन पंढरपूर. रविवार दिनांक 02/ 11/25 रोजी रात्री ह भ प धोंडीराम मुधाळे यांचे प्रवचन पंढरपूर अशा पद्धतीने या दक्षिणमुखी हनुमान मंदिर पायी दिंडीचा प्रवास होणार आहे. तसेच परतीचा प्रवास झाल्यानंतर सोमवार दिनांक 03/ 11 /25 रोजी दक्षिण मुखी हनुमान मंदिर इचलकरंजी येथे भजन प्रवचन झाल्यानंतर दुपारी ठीक 12:05 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दिंडी मार्गदर्शक ह.भ.प. सुभाष पाटील ह.भ.प. अनिता आनंदा गुरव व ह.भ.प. सुधा सुरेश सावंत दक्षिण मुखी हनुमान मंदिर पायी दिंडी आधारस्तंभ तानाजी पवार धनाजी डोईफोडे, नगरसेवक दिलीप मुथा, नगरसेवक श्रीरंग खवरे, अमर पुजारी बी.बी. पाटील, ह.भ.प. चाळाप्पा कांबळे, ह.भ.प. आनंदा गुरव, शिवाजी शिंदे, दिंडीचे प्रमुख विणेकरी ह भ प रामदास सावंत, ह.भ.प. सुरेश सावंत चोपदार, ह.भ.प. पांडुरंग माळगे, नियोजन ह.भ.प. तुळसा दंडगे, रोहिणी माळगे, सचिन तासगावे, सदाशिव माने, माइक व्यवस्था सुरेश मोरे, आचारी तुकाराम सपकाळ,दिंडी वाहन सेवा कालसिद्ध माने या दक्षिणमुखी हनुमान मंदिर पायी दिंडीचे प्रमुख फाउंडर ह.भ.प. राजू इंगळे, सर्जेराव जावळे, अनिल जिल्हा, लक्ष्मण मदगुडे, विजय विटेकरी, शितल माने, चंद्रकांत पाटील, सचिन दड्डी, श्रीमंत माळगे ,विनायक हेरवाडे, संदीप बोकेफोडे, सुरेश मोरे, योगेश आंबोलीकर सर्वांच्या सहभागाने इचलकरंजी ते पंढरपूर विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी वारक-यांचा सुखरूप आनंदमय प्रवास व्हावा, दिंडीतील सर्व भक्त वारकऱ्यांनी आपापल्या वस्तू ताट वाटी तांब्या अंथरून पांघरून बॅटरी हरिपाठ ध्वज टाळ डोक्यावर टोपी आवश्यक वस्तू घेऊन सर्व वारकरी भक्त दिंडीतून निघालेले असुन दिंडीसाठी सहकार्य करणारे देणगीदार व अन्नदान करणारे भाविक यांचे दक्षिण मुखी हनुमान मंदिर पायी दिंडी संचालक मंडळ यांनी आभार मानुन पायी दिंडी व्यवस्थितरित्या सुखरूप व्हावी यासाठी विठू माऊलीकडे प्रार्थना केलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:56 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!