नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राज्यात २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर भ्रष्टाचार विरोधी जन जागृती सप्ताहाचे आयोजन.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- केन्द्रीय सतर्कता आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिनांक २७/१०/२०२५ ते दिनांक ०२/११/२०२५ या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी राज्यात दि.२७ ऑक्टोंबर २०२५ ते दि. ०२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन दक्षता आपली सामायिक जबाबदारी (Vigilance: Our Shared Responsibility)” ही संकल्पना घेवुन केले जाणार असल्याचे केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांनी कळविले आहे.
या पार्श्वभुमीवर राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रना खालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम सहकारी संस्था स्वायत्त संस्था मार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून दि.२७ ऑक्टोबर २०२५ रोजी ११.०० वाजता सर्व शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेणेत येणार आहे. शपथ घेतल्यानंतर मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी या सप्ताहाचे निमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल, तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांचा संदेश राज्यातील जनतेसाठी देखिल प्रसूत करणेत येईल.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर या कार्यालयामार्फत भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती व्हावी या उद्देशाने कोल्हापूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलेले आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाचे पार्श्वभुमीवर आकाशवाणी, कोल्हापूर या रेडीओ केंद्रावरुन तसेव एफ.एम रेडीओ केंद्रावरून व न्यूज चैनेल यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपध्दती विषयीची मुलाखत प्रसारित करुन नागरिकांना लाचेच्या तकारी देणेविषयी आवाहन करणे. भ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उ‌द्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपध्दती विषयीची माहिती असलेल्या पत्रकांचे वाटप करणेत येईल.
स्थानिक वृत्तपत्रे, केबल चैनल, व्हॉटसअप ग्रुप, यु ट्युब व आकाशवाणी या प्रसार माध्यमांच्या मदतीने जनजागृती सप्ताहाबाबतची पार्श्वभुमी प्रसिध्द करणे. विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने कोल्हापूर जिल्हयातील सर्व प्रमुख शासकिय कार्यालयाच्या दर्शनी भागावर, रिक्षा, एसटी व रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे शहरातील विविध दर्शनी भागामध्ये टोल फ्री क. १०६४, मोबाईल कर्माक ९४०४३२१०६४ व मोबाईल अॅप बाबतची स्टिकर व बॅनर्स लावून प्रसिध्दी करणे.
कोल्हापूर जिल्हयातील स्वयंसेवी संघटना, अशासकीय संघटना, सेवाभावी संख्या, स्वातंत्र सैनिक, स्त्री संघटना, वाहन चालक मालक संघटना, कामगार संघटना, एम.आय.डी.सी. येथील कारखानदारांच्या कार्यालयास भेटी देवून त्यांना शासकीय योजनेंचा लाभ घेताना काही अडचणी येतात अगर कसे? या बाबत संस्थेचे प्रतिनिधी यांचे समवेत चर्चा करून त्यांचेकडे लाचेची मागणी होते काय या बाबत विचारपूस करणे.
ग्रामीण भागामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या उद्‌देशाने विविध सामाजिक सेवा संस्थेच्या मदतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे.
महिलांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उ‌द्देशाने महिला बचत गटांना भेटी देवुन भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे. जुन्या सापळा कारवाई झालेल्या केसेसमधील तक्रारदार व जागृत नागरिक यांचेशी संपर्क साधुन त्यांच्या नव्याने काही तकारी आहेत काय या बाबत विचारपूस करणे. अशा प्रकारे या सप्ताहात मोहीम राबवली जाणार आहे. नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेणेत यावा असे अव्हाना करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:27 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!