नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई!अवघ्या ८ तासांत खुनातील ४ आरोपी जेरबंद!

DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी नारायण कांबळे

कोल्हापूर : इचलकरंजी परिसरात घडलेल्या एका थरारक खुनाच्या प्रकरणातील चौघा आरोपींना अवघ्या आठ तासांच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी यश मिळवले आहे. या अत्यंत वेगवान व अचूक कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री १ ते २ वाजेदरम्यान इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर येथे राहणाऱ्या अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय ४४) यांचा निर्दयीपणे खून करण्यात आला. आरोपी पंकज चव्हाण व त्याचे साथीदार यांनी हॉटेल वैशाली येथे झालेल्या वादातून रागाच्या भरात अभिनंदन कोल्हापूरे यांना त्यांच्या घरातून बाहेर बोलावून, कबनूर ते कोल्हापूर रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर नेऊन सिमेंटच्या गोलाकार पाईपने डोक्यात प्राणघातक वार करून ठार मारले.
या प्रकरणी फिर्यादी डॉ. अभिषेक जयपाल कोल्हापूरे (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ७०५/२०२५, भा. न्या. सं. कलम १४०(१), १०३(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक

योगेश कुमार गुप्ता यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तातडीने पथक स्थापन करून तपास सुरू केला.
गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी चौंडेश्वरी फाटा, चिपरी (ता. शिरोळ) येथे येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
1️⃣ पंकज संजय चव्हाण (वय २७), रा. वारणा शॉपी जवळ, कबनूर
2️⃣ रोहित जगन्नाथ कोळेकर (वय २४), रा. कागल
3️⃣ विशाल राजू लोंढे (वय ३१), रा. लालनगर, इचलकरंजी
4️⃣ आदित्य संजय पवार (वय २१), रा. लालनगर, इचलकरंजी
चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड करीत आहेत.
ही धाडसी व तात्काळ कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, तसेच अंमलदार महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले व सायबर पोलीस ठाण्याचे सुरेश राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली.
👉 या अत्यंत वेगवान कारवाईमुळे कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की गुन्हेगार कितीही चतुर असले तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाहीत! 🚔🔥

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!