DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज:- मध्यप्रदेशातून आणलेल्या पाच गावठी पिस्तुले व १२ जिवंत काडतुसे असा ₹३.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मलिक सलीम शेख (२५) आणि प्रथमेश उर्फ पाटया पाटोळे (२२), दोघे रा. बामणोली, यांना सापळा रचून अटक केली.
चौकशीत त्यांनी मध्यप्रदेशातील उमरटी (जि. बडवाणी) येथून शस्त्रे आणल्याची कबुली दिली.
मुख्य पुरवठादार राजेंद्रसिंग उर्फ गोलुसिंग टकराना याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने केली.
गुन्हा मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद —आरोपी मलिक शेख हा यापूर्वीही दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता.



