DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी राजेंद्र पवार
सांगली :– एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्याच्या पथकाने गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ स्वतःजवळ बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ₹53,125/- किंमतीचा गांजा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 1.05 वाजता कुपवाड हद्दीतील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर रोडवरील हॉटेल वैभवसमोर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे –
1️⃣ धोपल उर्फ डोक्या महिमान्या काळे (वय 25, रा. सावळी, ता. मिरज)
2️⃣ कान्या शिवाजी पवार (वय 45, रा. कवलापूर, ता. मिरज)
या दोघांकडून
👉 धोपल काळे याच्याकडून 1 किलो 380 ग्रॅम गांजा (किंमत ₹34,500/-)
👉 कान्या पवार याच्याकडून 745 ग्रॅम गांजा (किंमत ₹18,625/-)
असा एकूण 2 किलो 125 ग्रॅम गांजा (किंमत ₹53,125/-) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 230/2025 नुसार
गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 20(ब)(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.34 वाजता अटक करण्यात आली असून,
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय गाढवे (मो. 9284909181) करत आहेत.



