एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार
कुपवाड:- कुपवाड येथील कृष्णा हाऊसिंग सोसायटी परिसरात अज्ञात चोरट्याने एका शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली असून, ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन महादेव घाटे (वय 46, व्यवसाय शिक्षक, रा. कृष्णा हाऊसिंग सोसायटी, कुपवाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वा. ते 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.15 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची एक्टिवा (MH10 DP 5723) व 20 हजार रुपये किमतीचा HP कंपनीचा काळ्या रंगाचा लॅपटॉप (Intel Core i3, 4GB RAM) असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 229/2025 भा.स.सं. कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास श्रेणी पीएसआय डी. जाधव हे करीत आहेत.



