नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेड जिल्ह्यामध्ये बनावट शासन, आर्मी, प्रेस गाड्यांचा धुमाकूळ फसवणुकीला खतपाणी, प्रशासनाला आव्हान?

DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात बनावट अधिकृततेचे फलक लावलेल्या गाड्यांचा अक्षरश धुमाकूळ सुरू असून, प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. महाराष्ट्र शासन भारत सरकार पोलीस वआर्मी प्रेस अशी नावे झळकवून काही गाड्या बेधडक फिरत असल्याचे चित्र उघड झाले आहे. हे प्रकार फसवणूक व दिशाभूल करण्याचे स्पष्ट उदाहरण ठरत असून, कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन, रेल्वे विभाग अशा संवेदनशील ठिकाणी या गाड्यांची उघड उघड वर्दळ होत आहे. संबंधित वाहनचालक हे फलक दाखवून कायद्याला चकवा देत आहेत. इतकेच नव्हे तर पोलीस अधिकारी चौकशीसाठी पुढे गेले असता गाडीवर प्रेस लिहिलेले दिसत नाही का? अशा उर्मट प्रतिक्रियाही दिल्या गेल्याचे समोर आले आहे. या फलकांच्या आडून अवैध धंदेही सुरु असल्याची धक्कादायक माहिती प्रकाशात आली आहे. पोलीस किंवा प्रेस नावाचे बोर्ड गाड्यांवर लावून काही जण सर्रास गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचे वृत्त आहे. यामुळे अशा बनावट फलकांचा वापर केवळ प्रशासनाला फसवण्यासाठी नव्हे तर गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासाठीच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियम-कायदे काटेकोरपणे लागू केले जातात. मात्र असे फलक लावून दहशत माजवणाऱ्या गाड्यांना मात्र मोकळे रान मिळत असल्याची भावना जनतेमध्ये पसरली आहे. त्यामुळे कायद्यापुढे सर्वजण समान आहेत हे दाखवून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. नांदेडमध्ये सुरु असलेल्या या बनावट फलकांच्या कारभाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जनतेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अन्यथा प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर गालबोट लागेल, आणि अशा फसवणुकीच्या गाड्यांना उत्तेजन मिळेल, असा गंभीर इशारा
समाजमनातून व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:55 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!