DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे कोल्हापूर
कोल्हापूर:- कोल्हापूर पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाप्रमाणे शहर विभागातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहुपुरी व राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील, शहर विभागातील दोन व दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीत यांचेविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई आढावा घेऊन आदेशित केले. गुन्हेगारांना उप विभागीय पोलीस अधिकारी शहर उप विभाग कार्यालय येथे ओळखपरेड करीता समक्ष हजर ठेवणेकरीता सुचित केलेवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेकडील 17 गुन्हेगार, जुना राजवाडा पोलीस ठाणेकडील 23 गुन्हेगार, शाहुपुरी पोलीस ठाणेकडील 24 गुन्हेगार व राजारामपुरी पोलीस ठाणेकडील 40 गुन्हेगार यांना त्यांचेवर दाखल असलेल्या गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईचे अभिलेखासह उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, यांचे समक्ष हजर ठेवले होते. पोलिसांनी आरोपीची ओळखपरेड घेवून आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकीचे अनुषंगाने समज देण्यात आले.



