नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

रेती माफियांचा तब्बल 80,50,000/-रूपयाचा मुद्देमाल जप्त.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड:- अवैधरित्या रेती उपसा करुन चोरटी विक्री करणारे आरोपीतांविरुध्द धडक कार्यवाही ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांना आदेशीत केले होते.
त्यावरून दिनांक 28.10.2025 रोजी उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड हे स्वतः वर नमुद अधिकारी व अंमलदार यांचेसह हद्दीत रवाना झाले असता नांदेड जिल्हयातील मौजे कल्हाळ मौ. भनगी, पिंळपगाव, वाहेगाव, मार्कंड येथील गोदावरी नदी घाटावर काही इसम गोदावरी नदी पात्रातुन इंजीनच्या सहाव्याने रेतीचा अवैध उपसा करून तराफ्याच्या सहाय्याने रेती घाटावर रेतीचा चोरटी विक्री करण्यासाठी साठा करीत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावरुन वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन छापा कार्यवाही केली असता सदर ठिकाणी विनापरवाना बेकायदेशिररित्या शासनाचा महसुल चुकवुन एकुण 11 इंजिन व एकुण 92 तराफ्यांच्या सहाव्याने गोदावरी नदी पात्रातुन रेतीचा उपसा करून एकुण 30 ब्रास रेतीचा साठा केलेला मिळुन आला. सदर ठिकाणी एकुण 80,50,000 रुपयांचा मुद्येमाल मिळुन आला. सदर मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करुन व काही मुद्येमाल जागीचनष्ट करुन मिळुन आलेल्या क्रमांक 01 ते 05 आरोपीना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर बाबत संबंधित आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
फिर्यादी पि.डी. मलदोडे, पोहेकॉ/741 स्था.गु.शा.नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरनं व कलम /2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 47,48 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल आरोपीचे नाव
1) विजेंद्र पिता रघुविसराम वय 40 वर्ष व्यवसाय मजुरी रा. सहापदिपु पोस्ट कमरिमा तहसिल जिल्हा बलीमा राज्य उत्तरप्रदेश 2) गुड्डु पिता लालबच्चन वय 25 वर्ष व्यवसाय मजुरी रा. बलीमा पोस्ट बलीमा तहसिल बलीमा जि. रमसम राज्य उत्तरप्रदेश 3) सकीर शेख पिता बरकत शेख वय 38 वर्ष व्यवसाय मजुरी रा. दख्खीन टमारपुर पोस्ट टमारपुर तहसिल नादानार जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड 4) आबुताहीर शेख पिता बरकत शेख वय 33 वर्ष व्यवसाय मजुरी रा. दख्खीन टमारपुर पोस्ट टमारपुर तहसिल नादानार जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड 5) नाझीर शेख पिता सिराजुला शेख वय-37 वर्ष व्यवसाय मजुरी रा.दख्खीन टमारपुर पोस्ट टमारपुर तहसिल नादानार जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड, 6) पंडीत गच्चे 7) सुनिल ऊर्फ वैभव मोरे रा. भनगी 8) देवीदास पुंड 9) नरहरी डक रा. पिंपळगाव 10) नारायण पुंड रा. पिंपळगाव निमजी 11) राजु बडवणे रा. पिंपळगाव कोरका 12) लक्ष्मण जयराम सोनटक्के 13) विठ्ठल ठाकुर रा. वाहेगाव.
कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार
मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड. मा श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर चार्ज नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड रवि वाहुळे सहा. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड
पोउपनि कोरे, पोउपनि तुकडे, ग्रेडपोउपनि दासरे, माधव केंद्रे, सपोउपनि करले, सपोउपनि दारासिंग राठोड, पोहेकॉ देविदास चव्हाण, पोहेका / मिलींद नरबाग, पोहेकॉ लोसरवार, पोकॉ मनोज राठोड, पोकों/ माने, पोकों/दासरे, पोकों/ गायकवाड, पोकॉ/ लहु चाटे, पोकों/ पिंगलवाड, पोकों/ डोंगरे, पोकों/मजर शेख, पोकॉ/2757 उमर शेख, पोकों/ कलंदर, पोकों / मोतीराम पवार, पोकों/ कदम, पोकों/ घोगरे, पोकॉ जाधव, चालक पोकों / लोने, पोकों/देवकत्ते सर्व नेमणुक स्था.गु.शा. नांदेड
सदरची उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मा. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!