रामतीर्थ व देगलूर पोलीसांनी मिळून दरोडयाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना अटक करुन एकुण 10 लाख 21 हजार 100/-
रुपयेचा मुद्देमाल केला जप्त..
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – साईनाथ खंडेराय
नांदेड:- ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत माली गुन्हे उघडकीस आणण्याचे व टोळी गुन्हेगारांना पकडुन त्यावर कार्यवाही करण्याचे सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.
त्यावरुन सपोनि विक्रम हराळे पो स्टे रामतीर्थ हद्योत व पोनि मारोती मुंडे पो स्टे देगलूर हथीत वरील टिम सह पेट्रोलिंग करीत असतांना माहीती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाची पिकअप व डिझायर कार त्यामध्ये संशयीत शिखलकरी हत्यारासह दरोडया सारखा गंभीर गुन्हा करण्याचे उददेशाने देगलूर कडुन नरसी कडे येत आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाली त्यावरुन सपोनि हराळे व पोनि मुंडे यांनी त्यांचे टिमसह सदर वाहनाचा पाठलाग करुन पो स्टे रामतीर्थ हद्यीत मी. डोनगांव खु शिवारात दिनांक 29/10/2025 रोजी सकाळी 04.00 वा सु सदर दोन्ही वाहन पकडले असता तेथे आरोपी नामे बबलुसिंग ऊर्फ हणमंतसिंग पिता हत्यारसिंग टाक रा इंद्रानगर कळमनुरी जि हिंगोली (2) करतारसिंग हत्यारसिंग टाक रा. इंद्रानगर कळमनुरी जि हिंगोली (3) प्रफुल चोखाजी पाईकराव रा. धानोरा ता कळमनुरी जि हिंगोली (4) सोनु सुभाष सापनर रा. धानोरा ता कळमनुरी जि हिंगोली (5) सुर्यकांत रामराव कुगावकर रा. माळेगांव ता कळमनुरी जि हिंगोली पैकी करतारसिंग हत्यारसिंग टाक रा. इंद्रानगर कळमनुरी जि हिंगोली व सुर्यकांत रामराव कुगावकर रा. माळेगांव ता कळमनुरी जि हिंगोली ते मिळून आले व इंतर तिघेजन आंधाराचा फायदा घेवुन पसार झाले. सदर वाहने व आरोपीतांना पो स्टे ला आनुन सदर वाहनाची व आरोपीतांची झडती घेतली असता त्याच्याकडे दरोडया सारखा गंभीर गुन्हा करण्याचे उददेशाने धारधार तलवार, चाकु, लॉखड़ी पाईप, रॉड व स्टिलचा रॉड असे घातक हत्यार मिळून आले. त्यावरुन सदर आरोपी हे दरोडा करण्याचे उददेशानेच हिंगोली जिल्हयातून नांदेड जिल्हयात आल्याची खात्री झाली.
त्यावरुन पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे
पोहेको/ 122 व्यंकट सोनबाजी कामपुणे वय 51 वर्ष पो स्टे रामतीर्थ यांच्या फिर्यादीवरून गुर नं 321/2025 कलम 310(4),132 BNS सहकलम 4/25 शस्व अधिनियम कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीतांकडून 01 बोलोरो पिकअप जिप, 01 डिझायर कार. 01 तलवार, लोखंडी रॉड, चाकु, 02 मोबाईल व स्टिलचा पाईप असा एकूण 10, लाख 21 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना अटक केली असुन PCR घेवून अधिक तपास सुरु आहे.
गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
मा श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेव नांदेड (IPS)
मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर व नांदेड
मा. श्री संकेत गोसावी उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग देगलूर चार्ज बिलोली
यांचे मार्गदर्शनाखाली
सपोनि विक्रम हराळे, पोउपनि नरवाडे, पोहेकी। 22 कामपूर्ण, चापोहेको 2258 धुताडे, पोकों/1451 कत्ते ने पो स्टे रामतीर्थ पोनि मारोती मुंडे, पोहेकों/2934 पवार, पोकों 200 मोरे पोहेकों/647 मरगेवाड पो स्टे देगलूर रामतीर्थ व देगलूर पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल मा. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.



