नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रतिबंधित पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या इसमावर MIDC कुपवाड पोलिसांची कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज:- एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्याकडून महाराष्ट्र

शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी — शिवानंद बाळासाहेब न्यामगौडर (वय ३०, रा. कागवाड, जि. बेळगाव) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ₹५३,४३० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त मालामध्ये “विमल पान मसाला (केसरयुक्त)” व “सुगंधित तंबाखू”चे विविध पाऊच तसेच हिरो स्प्लेंडर (क्र. KA-23-EQ-5874) वाहनाचा समावेश आहे.
ही कारवाई दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी कुपवाड एमआयडीसी परिसरात करण्यात आली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्र. 231/2025 दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची विक्रीसाठी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास महिला पो.उ.नि. कोळेकर या करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!