DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी: प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर:- चंदगड पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुची महाराष्ट्रात विशेषता चंदगड तालुक्यात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत दहा जणांना अटक केली असून 42 लाख 12 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटे तिलारीनगर ते धामणी रोडवरील बांदराईवाडी हद्दीत करण्यात आली.
याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष बाबासाहेब शिऊडकर यांनी दिली असून, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींनी संगनमत करुन गोवा बनावटीच्या दारुचा साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला होता.या प्रकरणात धुळो निणु फोंडे रा. साऊथ गोवा, विजय वसंत झोरे दोडामार्ग, गणपती मारुती पाटील मांडेदुर्ग, संजय पांडुरंग नाईक नाईक वस्ती हलकर्णी, दिलीप शिवाजी मयेकर पार्ले, अजय दत्तू नाईक वरगाव, सागर नाईक रा गोवा, सुभाष बांदीवडेकर रा नागणवाडी, उमेश आवडण रा तुडीये आणि विजय आवडण रा वैतागवाडी ता चंदगड यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे तर उर्वरित चार आरोपी फरार आहेत.
गोवा बनावटीच्या दारुचा साठा आरोपी महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून वाहतूक करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत दारुच्या बाटल्यांसह चार वाहने जप्त करण्यात आली असून गोवा बनावटी दारू व एकूण मुद्देमालाची किंमत 42 लाखांहून अधिक आहे.सदर प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा र. न. 286/2025 नुसार व दारूबंदी कायदा कलम 65 अ. ई, 83,90,108 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास चंदगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक आशुतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदा नाईक सह पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहेत. चंदगड पोलिसांच्या या धडक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



