तीन चोरीच्या मोटरसायकलींसह 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त! आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता!
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨🚨प्रतिनिधी – रमजान मुलानी
सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपी गणेश अंकुश बंडगर (वय 31, रा. चिंतामणीनगर, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटरसायकलींसह एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सांगली बाह्यभागातील कमी किमतीत मोटरसायकल विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने तीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण मुळगावकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.



