नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मालेगाव तालुका पोलिसांची सणसणीत कारवाई — परराज्यातील दोघांकडून १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त!

💥 बनावट चलनी नोटांचा मोठा पर्दाफाश 💥

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी योगेश गवळे

मालेगाव :- नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत परप्रांतीय दोन आरोपींकडून तब्बल १० लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर काही संशयास्पद इसम बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने ए-वन सागर हॉटेल समोर सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले.
सदर आरोपींची नावे —
1️⃣ नाजिर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय ३४, रा. मोमिनपुरा, बुरहानपूर, म.प्र.)
2️⃣ मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय ३३, रा. हरीरपुरा, बुरहानपूर, म.प्र.) अशी आहेत.
त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या २००० बनावट नोटा, दोन मोबाईल हँडसेट आणि IMPEX कंपनीची बॅग असा एकूण १०,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नोटांची तपासणी केल्यानंतर त्या चलनाच्या हुबेहुब प्रती असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी भारतीय चलन कायदा व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३(५) अन्वये मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयाने त्यांना ०८ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींकडून या बनावट नोटा कोठून आणल्या आणि कोठे विक्री करणार होते, याचा तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीरसिंह संधू, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सपोनि प्रिती सावंजी, पोउनि तुषार भदाणे, पोहवा अमोल शिंदे, पोहवा प्रकाश बनकर, पोकॉ गणेश जाधव आणि मोरे यांच्या पथकाने केली आहे.
➡️ मालेगाव तालुका पोलीसांची ही कारवाई उल्लेखनीय ठरली असून, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि बनावट चलनाच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत झाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!