नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! लुटेरे जेरबंद – सोन्याचे मंगळसूत्रासह मुद्देमाल जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी गोकुळ नगराळे

साक्री : — साक्री पोलिसांनी वेगवान तपास आणि अचूक कारवाई करत पिंपळनेर येथील महिलेला लुबाडणाऱ्या दोन लुटारूंना अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले. या कारवाईत चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र देखील जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथील शोभाई कैलास गांगुर्डे (वय ५५, व्यवसाय – टेलर) या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारी, त्या पिंपळनेर येथील यशोदानगर परिसरात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. एकाने चाकू दाखवत धमकी दिली तर दुसऱ्याने गळ्यावर हात टाकून दागिना हिसकावला आणि दोघेही पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तत्परतेने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती व चौकशीतून पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे दशरथ भवरे आणि भूषण गुरव अशी आहेत. हे दोघेही साक्री परिसरातील रहिवासी असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्रासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईमुळे साक्री पोलिसांचे कौतुक होत असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कामगिरीचे स्वागत केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!