नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कार्यसम्राट आमदारांचे प्रभाग १० मधील विकासकामांसाठी २.१० कोटी निधी मंजूर – आजी माजी आमदारांचे हस्ते कामांचा शुभारंभ

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- निवास गागडे

इचलकरंजी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी हाउसिंग सोसायटी, कामगार चाळ, भोने माळ, रेणुका नगर व इंडस्ट्रियल इस्टेट परिसर अशी 11 कामे करण्यासाठी 2.10 कोटी रुपयांच्या विकास कामाचा भव्य शुभारंभाचा कार्यक्रम सिद्धार्थ हौसिंग सोसायटी भाग्यरेखा टॉकीज समोर इचलकरंजी शहराचे माजी उपनगराध्यक्ष रवि राजपूत यांच्या पाठपुराव्याने तसेच माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.
इचलकरंजी शहराचे कार्यसम्राट आमदार डॉ. राहुल आवाडे व मा. आ. सुरेशरावजी हाळवणकर यांच्या शुभ हस्ते कामाचे फलकाचे फीत कापून भव्य शुभारंभ केले.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात झाली असून निमित्ताने आजी-माजी आमदार यांची टोलेबाजी भाषण झाले.आमदार राहुल आवाडे यांनी आमचे कार्य बघून विरोधाचे पोटात दुखत असल्यामुळे आता इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधून झालेल्या आहेत. पंचगंगा शुद्धीकरण व बोरवेलच्या माध्यमातून पाणी आणण्याचे काम हाती घेतले असून विरोधकांनी कितीही माझ्याबद्दल टीका केल्या तरी काम पूर्ण केल्या शेवाय थांबणार नाही असे सांगितले. नगराध्यक्ष रवि रजपुते यांचे भागात चांगले कार्य असून सदैव चर्चेत राहणारे खंबीर नेतृत्वपद कार्य करणारे व या कार्यक्रमास सुंदर नियोजन करून आम्हासमान सन्मान दिला म्हणून त्यांचे कौतुकास्पद आभार मानले.माजी आमदार सुरेश रावजी हाळवणकर म्हणाले आमदार राहुल आवाडे इचलकरंजी पाण्याचा प्रश्न सोडवून इचलकरंजी शहराला भरपूर पाणी मिळणार असून पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील चारही जागा कमळाच्या आणून विरोधकांची डिपॉझिट जप्त करू तसेच भागात 4 उमेदवार ठिकाणी 10 उमेदवार तिकीट मागणी करत असून राहिलेल्या 6 जणांनी पक्षाशी बंडखोरी न करता संघटित राहून आपल्या उमेदवाराला सहकार्य करावे. उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे इचलकरंजी शहरात असणाऱ्या पाच झोपडींचा विषय घेऊन गोरगरीब झोपडपट्टी वासियांना आहे त्या ठिकाणी घरे बांधून देऊन इचलकरंजी झोपडपट्टी मुक्त करण्यात यावी अशी मागणी केली. इचलकरंजी महानगरपालिकेचे कामगार अधिकारी विजय राजापुरे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश रावजी हळवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ दिले. नेहरूनगर झोपडपट्टीच्या वतीने निवेदनाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बांकामासाठी 60 ते 70 लाख मंजूर झाला असून त्वरित बांधून द्यावे.नेहरूनगर झोपडपट्टी येथील बैठी घरे मालकी हक्कची बांधून मिळावीत. याकार्यक्रमास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी चेअरमन प्रमोद बेलेकर ,महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी चेअरमन धनाजी डोईफोडे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे, माजी आरोग्य सभापती नरेश नगरकर, माजी नगरसेवक दिलीप मुथा, सामाजिक कार्यकर्ते किरण पवार, माजी नगरसेवक संगीता कांबळे, माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव, निवास गागडे, शामराव कुलकर्णी, राजू राजपूत, युवा नेते सिद्धार्थ कांबळे, युवा नेते रोहित रजपते, महिला मोर्चा पश्चिम अध्यक्ष सपना भिसे,महिला मोर्चा पूर्व अध्यक्ष सीमा कमते, नगरसेवक आप्पा काजवे, उद्योजक प्रशांत पांढरपट्टे, पापा उस्ताद, प्रशांत कांबळे,दत्ता माणगावकर, ह भ प विष्णुपंत नेतले, बाबुराव भंडारे, अण्णा मांगलेकर तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक दिलीप मुथा यांनी आभा मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:50 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!