नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी दोघे ताब्यात मुद्देमाल जप्त- चंदगड वनविभागाची कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदीप सकट

कोल्हापूर:- चंदगड वनविभागाला
एक गुप्त बातमी मिळाली त्यानुसार वनविभागाने नागणवाडी वाळकोळी गंधवगड रस्त्याने गस्त घालत असता मौजे वाळकोळी गावचे हद्दीतील मौजे वाळकोळी फाट्या नजिक ट्रॅक्टर क्र. MH०९GM५०८४ व विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली मधून इंजायली इमारती लाकुड माल नग २३/५.२३८ घ.मी. वाहतुक करीत असताना मिळून आला मोक्यावर ट्रॅक्टर चालक तुफेल इकबाल कदीम, रा. डोणेवाडी व लाकुड खरेदीदार अजरुद्दीन रजाक सय्यद रा. नेसरी यांना सदर लाकुड माल वाहतुकीसाठी व झाडेतोडीसाठी परवाना आणि कोणत्याही प्रकारचा पास परवाना मोक्यावर दाखवला नाही त्यानुसार भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील तरतुदीनुसार ट्रॅक्टर क्र.MH०९GM५०८४ व विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली व त्या मधील इंजायली इमारती लाकुड माल नग २३/५.२३८ घ.मी. जप्त करुन ताब्यात घेतले. तुफेल इकबाल कदीम, रा. डोणेवाडी व लाकुड खरेदीदार अजरुद्दीन रजाक सय्यद रा. नेसरी यानी विनापरवाना लाकूड मालाची वाहनातुन वाहतूक केलेने त्याचे विरुध्द वनविभागाने
ट्रॅक्टर-१ (MH०९GM५०८४)
विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली -१ अंदाजे किंमत-२५०००० रूपये, इंजायली इमारती लाकूड माल नग २३/५.२३८ घ.मी. अंदाजे किंमत-३३६४३ रूपये असा एकुण २८३६४३ रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन दोघांचेवर वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल के. एस. डेळेकर, वनरक्षक सागर कोळी, वनसेवक नितीन नाईक, सचिन कांचळे व आकाश गडकरी यांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास वनक्षेत्रपाल तु.र. गायकवाड व वनपाल के. एस. डेळेकर हे करीत आहेत. अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध शिकार, अवैध अतिक्रमण, जंगल क्षेत्रात वनवणव्याची माहिती मिळताच नजिकचे वनविभागाचे टोल फ्रि क्रमांक १९२६ वर तात्काळ माहिती देवून सहकार्य करावे आपले नाव गोपणीय ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!