नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

म्हसावद परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!

बेकायदेशीर गांजा लागवड प्रकरणात ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी रविंद्र गवळे

नंदुरबार :- म्हसावद पोलिस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारात अंमली पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ९,८३,४७० रुपये किमतीचा ९८ किलो ३४७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, सुरत्या ऊर्फ सुरसिंग डुगर्या पाडवी (रा. जुनी पिंप्राणी, पोस्ट रामपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) हा आपल्या शेतात गांजाची लागवड करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या देखरेखीखाली पथक तयार करण्यात आले.
सदर पथकाने तत्काळ छापा टाकून तपासणी केली असता, संशयित इसम ठिकाणी नसून त्याच्या शेतात गांजासदृश झाडांची लागवड करण्यात आलेली असल्याचे आढळले. तपासणीअंती सदर झाडांचा एकूण ९८ किलो ३४७ ग्रॅम वजनाचा व सुमारे ९ लाख ८३ हजार ४७० रुपये किमतीचा गांजा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी सुरत्या ऊर्फ सुरसिंग डुगर्या पाडवी याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ कायद्याचे उल्लंघन करून गांजाची लागवड व जोपासना केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१२/२०२५ कलम 20(अ)(ब), 22(क) गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. मुकेश पवार, पोउपनि श्री. विकास गुंजाळ, असई राकेश वसावे, पोहेकॉ दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनिल येलवे, पुरुषोत्तम सोनार, सचिन बसावे, पोना दिपक वारुळे, विकास कापुरे, पोशि रामेश्वर चव्हाण व अभिमन्यु गावीत यांनी संयुक्तपणे केली.
👉 या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायांना मोठा आघात बसला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!