नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुर्गम भागातील दुहेरी खून उघडकीस — कोल्हापूर पोलीसांची शिताफीने उकल!

वृद्ध कंक दांपत्याच्या खुनाचा गुन्हेगार विजय गुरव जेरबंद

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी नारायण कांबळे

कोल्हापूर :– शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दुर्गम निनाई परळी (गोळवण वस्ती) येथे घडलेल्या वृद्ध दांपत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कौशल्यपूर्णरीत्या उकल करत सराईत गुन्हेगारास अटक केली आहे.
सौ. रखुबाई निनु कंक (वय ६५) व निनु यशवंत कंक (वय ७०) हे वृद्ध दांपत्य आपल्या वस्तीवर राहात होते. दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मुलगा सुरेश कंक हा पालकांची विचारपूस करण्यासाठी गेला असता त्याला आई रखुबाई यांचा मृतदेह गवतामध्ये आणि वडील निनु कंक यांचा मृतदेह जवळच्या डॅमच्या काठावर सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्रथमदर्शनी ही घटना हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याची असल्याची शंका होती. त्यामुळे शाहुवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी व परिस्थितीवरून गुन्हा घडल्याची शक्यता लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाचा तपशीलवार तपास, तांत्रिक विश्लेषण, वनविभागाशी समन्वय आणि संशयित हालचालींची चौकशी सुरू केली. तपासाअंती हिंस्त्र श्वापदाचा हल्ला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी शाहुवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीनुसार, पोलिसांना विजय मधुकर गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) या सराईत गुन्हेगाराचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला आंबा (ता. शाहुवाडी) येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
विजय गुरव हा विविध मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये वांछित आरोपी असून, काही दिवसांपासून तो डोंगराळ भागात लपून राहत होता. आपल्या अस्तित्वासाठी तो गुराखी व ग्रामस्थांकडून अन्न मागत होता. अशाच वेळी तो गोळवण वस्ती येथे आला असता वृद्ध कंक दांपत्याने त्याला आश्रय देण्यास नकार दिल्याने चिडून त्याने लाकडी दांडके व दगडाने त्यांचा खून केला, अशी आरोपीने कबुली दिली आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पो.उ.नि. शेष मोरे, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, राम कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, अमित सर्जे यांनी मोलाचे योगदान दिले.
गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:58 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!