नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विभागीय आयुक्त पूणे यांचा सरपंच अपात्रतेचा आदेश रद्द.

देवरवाडी सरपंचपदी गीतांजली सुतार यांना दिलासा.

DPT NEWS✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधीप्रा.नागेंद्रजाधव

कोल्हापूर:- विभागीय आयुक्त पूणे विभाग, पुणे याच्या दि. 7/7/2025 रोजी च्या देवरवाडी सरपंच श्रीमती गीतांजली सुतार यांच्या अपात्रतेबाबतच्या आदेशांविरुद्ध अपीलार्थी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 (3) अन्वये मंत्री ग्रामविकास व पंचायतराज, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या न्यायालयात दि.4/8/2025 रोजी अपील दाखल करण्यात आले होते.

सदर अपीलाची सुनावणी दि. 10/09/2025 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यास अनुसरून मंत्री ग्रामविकास, पंचायतराज मंत्रालय,मुंबई यांच्याकडून दि. 28/10/2025 रोजी पारित केलेल्या आदेशात देवरवाडी सरपंच पद अपात्रतेबाबत विभागीय आयुक्त पूणे यांचा आदेश रद्द करण्यात येवून अपीलार्थी सरपंच गीतांजली सुतार या सरपंचपदी पात्र असल्याचा, दिलासा देणारा निकाल दिला आहे व संबंधीत अधिकारी, प्राधिकारी यांनी ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी सरपंचपदी गीतांजली सुतार याच कायम राहणार असून त्यांनी पुन्हा सरपंचपदाचा पदभार स्वीकारला आहे. एक महिला सरपंच असूनही प्रतिकूल परिस्थितीवर व विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या आरोपावर मात करत या न्यायलढ्यात त्यांनी यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!