नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ॲड. चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांनी थोपवला ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

धुळे – धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत अलीकडे सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रयत्न करण्यात आला. एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन स्वतःला “न्यू अॅश्युरन्स इन्शुरन्स कंपनीचा” प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि शरद पाटील यांच्या नावाने २०१४ साली विमा पॉलिसी घेतली असल्याचा खोटा दावा केला. पुढे त्या व्यक्तीने केवायसी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रिमियन भरावा लागेल असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला.परंतु शरद पाटील यांनी तो फोन संशयास्पद असल्याचे ओळखले आणि तात्काळ सायबर कायदा तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता ॲड. भंडारी यांनी तत्पर कारवाई करण्याचे ठरवले.तसेच शरद पाटील यांच्या विनंतीनुसार ॲड. भंडारी यांनी त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधून संवाद साधला आणि तपास केला तेव्हा त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावरील व्यक्तीने २०१४ ची बनावट विमा पॉलिसी असल्याचा खोटा दावा केला, केवायसी अपडेट करा अशी सक्ती केली तसेच प्रिमियम भरल्याशिवाय क्लेम मिळणार नाही अशी धमकी देवून शरद पाटील यांची बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.सदरील तपासादरम्यान ॲड. भंडारी यांच्या असे निदर्शनास आले की, ही एक संघटीत आणि मोठया प्रमाणावर चालणारी राष्ट्रीय इन्शुरन्स फ्रॉड स्कॅम आहे. ज्यात बनावट पॉलिसी दाखवून संबंधित अज्ञात टोळीकडून गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न केला जातो.

ॲड. भंडारी यांनी फसवणुक करणा-यास ठोस प्रश्न विचारल्यावर तो गोंधळला आणि फोन कट केला. त्यामुळे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत होणारा मोठा आर्थिक घोटाळा वेळेवर टळला व सत्य वेळेतच उघड झाले.तरी सदर बाबीनंतर ॲड. भंडारी यांनी नागरीकांना असे आवाहन केले आहे की, जर कोणालाही असे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित केवायसी अपडेट करण्यासाठी फोन कॉल येत असतील तर त्याची सर्वप्रथम पुर्णपणे पडताळणी करावी व त्यानंतरच सदर बाबीवर विश्वास ठेवावे. जर आपल्यासोबत असे फ्रॉड झाले असतील तर १९३० व १९४५ या टोल फ्री कमांकावर संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंद करावी कारण सतर्कता आणि पडताळणीमुळे लाखोंची फसवणुक टळू शकते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:48 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!