नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तलाठी व कोतवाल लाच स्वीकारताना रंगेहात अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी नारायण कांबळे

कोल्हापूर :– हातकणंगले तालुक्यातील शहापूर येथील तलाठी व कोतवाल यांनी शेतजमिनीवरील नोंदणीसाठी २५ हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांनी सापळा रचत कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार (वय ३५) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, आरोपी तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२) व कोतवाल नेताजी केशव पाटील (वय ४५) यांनी तक्रारदारांच्या वडिलांचे नाव गट क्रमांक ७२९ मधील सातबाऱ्यावर फेरफार करून नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी १० हजार रुपये कोतवाल नेताजी पाटील यांना देण्यास सांगण्यात आले होते.
६ नोव्हेंबर २०२५ रोजी पडताळणीदरम्यान आरोपींनी मागणी सिद्ध झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपींच्या मोबाईल फोनची जप्ती करण्यात आली असून, त्यांच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पो.ह. सुधीर पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील, प्रकाश चौगुले व चालक गजानन कुराडे यांचा समावेश होता.
तपास पोलिस निरीक्षक उज्वला भडकमकर या करत असून, संपूर्ण कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील (ला.प्र.वि., कोल्हापूर) यांनी केले.
लाचलुचपत विरोधी विभागाची ही आणखी एक यशस्वी कारवाई असून, भ्रष्टाचाराविरुद्धचे अभियान अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:21 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!