नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत अवैध गुटखा साठा जप्त — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी: नारायण कांबळे

कोल्हापूर:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनांनुसार कोल्हापूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू असून, त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजीत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्तीची कारवाई केली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने इचलकरंजी येथील इंदिरानगर, गल्ली क्र. ३ येथील वसीम यूनुस तांबोळी (वय २९) यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. छाप्यात विविध कंपनींचा सुगंधी तंबाखू, सुपारी, पान मसाला आणि सुगंधी जर्दा असा एकूण ₹१,७१,७१०/- किमतीचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतानाही आरोपी तांबोळी हा आपल्या घरातून गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगले, संतोष बरगे, राजू कोरे व सागर चौगले यांनी सहभाग घेतला.
👉 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सततच्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!