नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, येवला यांचा निर्णय

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी योगेश गवळे

येवला :– अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, येवला यांनी २० वर्षे सश्रम कारावास व ३०,००० रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्हा येवला तालुका पोलीस ठाणे गु. र. नं. ५४५/२०२३ भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६, ३५४ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८, १२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आला होता.
आरोपीचे नाव योगेश पंढरीनाथ घुगे (वय ३३, रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) असे असून, त्याने दि. ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री सुमारास ९.३० वाजता येवला तालुक्यातील राजापुर येथे अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून फूस लावली आणि तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणात पिडीतेच्या आजोबांनी येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यानंतर येवला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीस अटक केली. या गुन्ह्याचा तपास मनमाड उपविभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांनी केला. त्यांनी आपल्या पथकासह आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता सरोदे यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली, तर पैरवी अधिकारी पो. ह. वा. पवार यांनी खटल्याची पाठपुरावा केली. तसेच सपोनि श्रीकांत पाटील, पोउनि माधुरी कंखरे, महिला पोलीस अंमलदार तळपाडे, आणि अश्विनी परदेशी यांनी फिर्यादी, पंच व साक्षीदारांना कायदेशीर मार्गदर्शन करून गुन्हा सिद्ध होण्यासाठी प्रयत्न केले.
शेवटी, मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश लोकवाणी यांनी आरोपी योगेश घुगे यास दोषी ठरवून भादंवि कलम ३७६, ३५४ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व ३०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
👉 पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आणि सरकारी यंत्रणेच्या भक्कम पुराव्यांमुळे हा गंभीर गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन पीडितेला न्याय मिळाला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:55 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!