नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत प्रबोधन व कारवाईचा इशारा

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी :- रमजान मुलानी

सांगली :- कडेगाव, दि. ०७ नोव्हेंबर २०२५ — कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने रायगाव फाटा ते कडेपुर तसेच कडेगाव ते कडेपुर या राज्य महामार्गावर पेट्रोलिंग करून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्यांची तपासणी केली. या वेळी पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था, आळसंद यांच्या सहकार्याने संबंधित वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असल्याचे वाहनचालकांना सूचित करण्यात आले. तसेच पोलीस ठाण्याने ऊस कारखान्यांना लेखी पत्राद्वारे सर्व ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी गणेश कोकाटे यांनी सांगितले की, “अपघात टाळण्यासाठी प्रत्येक ऊस वाहतूक वाहनावर रिफ्लेक्टर लावणे अत्यावश्यक आहे. कोणीही ट्रॅक्टर विनारिफ्लेक्टर आढळल्यास वाहतूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच अशा वाहनामुळे अपघात झाल्यास संबंधित चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच त्यांनी सर्व चालकांना दारूच्या अवस्थेत वाहन न चालविण्याचे, ट्रॅक्टरवरील कर्कश आवाजाचे टेप रेकॉर्ड काढून टाकण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. कोकाटे यांनी पुढे सर्व नागरिकांना संदेश दिला की, “दुचाकी चालकांनी हेल्मेटचा आणि चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.” सदर मोहिमेत सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था, आळसंद चे अध्यक्ष अजित जाधव, तसेच पदाधिकारी अनिल पाटील, सचिन कारंडे आणि सचिन शिरतोडे उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!