नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भरधाव ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद रोडवर भीषण अपघात

DPT NEWS ✍️🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – अजगरभाई मुल्ला

चाळीसगाव :– चाळीसगाव तालुक्यातील दहिवद गावाजवळ दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत चिंधा पाटील (वय 49, रा. बोरखेडा पिंपळगाव, ता. चाळीसगाव) हे आपल्या बजाज कावासकी कंपनीच्या बॉक्सर मोटारसायकल (क्र. MH 19 R 8824) वरून दहिवद गावाच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या अशोक लेलैंड कंपनीच्या ट्रक (क्र. HR 74 B 0450) वरील चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवित ट्रकची मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
या धडकेत भागवत पाटील रस्त्यावर फेकले गेले व त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलिस हवालदार विजय शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी किशोर शिवाजी पाटील यांच्या जबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 359/2025 भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(ब), 324(4), 184, 134(ब) प्रमाणे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपघाताची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास ई-मेलद्वारे कळविण्यात आली असून पुढील तपास पो. हे. का. विजय शिंदे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:51 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!