नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांचा प्रभाग क्रमांक ७ मधील माजी व भावी नगरसेवकातर्फे सत्कार

DPT NEWS ✍️📰🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

धुळे :– आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांची धुळे महानगरपालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाच्या या निर्णायामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक अधिक जोमदारपणे लढवली जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीनिमित्त प्रभाग क्रमांक ७ मधील माजी नगर सेवक रंगनाथ ठाकरे व भावी नगर सेवक विजय देवरे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवून, अभ्यासपूर्ण नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक निवडणूक लढणारी पक्षसंस्था आहे. कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावरच विजयाचा पाया रचला जातो.”
सत्कारास प्रभाग क्रमांक ७ मधील वाडी भोकर, वलवाडी, नकाने तसेच कॉलनी परिसरातील अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या सत्कार प्रसंगी उपस्थित नागरिकांनी आमदार अग्रवाल यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:28 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
2 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!