नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत थरार! खूनप्रकरणातील आरोपींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न — पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

DPT NEWS ✍️📰🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी राजेंद्र पवार

एक हल्लेखोर ताब्यात; रिव्हॉल्वर आणि कोयता जप्त — अन्य तीन फरार

मिरज:- दि. 12 नोव्हेंबर 2025
मिरजेतील निखिल कलगुडगी खूनप्रकरणातील मुख्य आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांच्यावर आज दुपारी मिरजेच्या शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरात खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेदरम्यान, पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल गवळी यांनी संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका हल्लेखोराला तात्काळ पकडले. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर आणि कोयता जप्त करण्यात आला असून, त्याचे तीन साथीदार गुन्हेगार फरार झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी एक संशयित व्यक्ती त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसल्याने पोलिसांनी त्याला अडवले. त्याच वेळी इतर तीन साथीदारांनी पळ काढला.
प्राथमिक चौकशीत असे समजते की प्रथम एकाने गोळी झाडून हल्ला करायचा आणि नंतर उरलेल्या तिघांनी वार करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता. परंतु पोलिसांच्या जागरूकतेमुळे हा कट फसला.
घटनेनंतर मिरज पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त वाढवला असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, निरीक्षक किरण चौगुले व सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.
या थरारक घटनेमुळे मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!