नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार ACB च्या जाळ्यात

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लाच स्विकारताना सेवा निवृत्त निवासी नायब तहसीलदार जाळ्यात- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये यातील तक्रारदार यांचे वडील, आत्या व काका यांचे नावे रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील गट नं.९८७ मध्ये समाईक शेत जमीन आहे. सदर गट नं.९८७ मधील ०.६० गुंठे क्षेत्र दुधगंगा कालव्यासाठी भुसंपादित केले आहे. भुसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळणेच्या अनुषंगाने तकारदार यांचे वडील, काका व आत्या यांचे नांवे नोटीस आली होती. तकारदार यांचे वडील मयत असल्याने तकारदार यांनी त्यांचे जमिनीचा मोबदला रक्कम मिळणेकरीता दिनांक ०४/०९/२०२५ रोजी उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रमांक ६ कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज केला होता. सदर अर्जाची चौकशी करण्याकरीता उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रमांक-६, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे गेले असता सदर कार्यालयातील क्लार्क इलाई मुल्ला यांना भेटले त्यावेळी त्यांनी तकारदार यांचे भुसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रमांक-६, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठांकडून काम करून देण्याकरीता १०,००० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तकार याबाबत दिली.तक्रारदार यांना त्यांचे रेंदाळ, ता. हातकणंगले येथील दुधगंगा कालव्यामध्ये भुसंपादित आलेल्या जमिनीचा मोबदला वरिष्ठांकडून मंजूर करून देण्याकरीता १०,००० हजार रूपयांची लाच मागणी करून तडजोडी अंती ८,००० हजार रूपयांची लाच मागणी करून स्विकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा कारवाई आयोजीत करण्यात आले.पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडुन सेवा निवृत्त निवासी नायब तहसीलदार ईलाही मिरा मुल्ला, वय-७१ वर्षे, पद (सेवानिवृत्त नायब तहसिलदार) कंत्राटी कर्मचारी, भुसंपादन विभाग-६ कार्यालय, कोल्हापूर यांनी ८,००० हजार रूपये लाच रक्कम स्विकारलेने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. इलाही मिरा मुल्ला यांचेविरूध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, सफी प्रकाश भंडारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, संगिता गावडे, पोलिस नाईक सचिन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल उदयसिंह पाटील, सहाय्यक फौजदार गजानन कुराडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी कारवाई केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!