नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरज सिव्हिलवर हल्ल्याच्या तयारीत असलेली टोळी चार तासांत जेरबंद

मिरज पोलिसांची वेगवान कारवाई; गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे व कोयता जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज:- दि. 13 नोव्हेंबर
मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनाच्या प्रकरणातील आरोपींवर हल्ला करण्याच्या उद्देशाने शस्त्रासह आलेल्या तरुणांच्या टोळीला मिरज पोलिसांनी अवघ्या चार तासांत पकडत मोठी कारवाई केली आहे. या टोळीच्या ताब्यातून गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, कोयता आणि मोबाईल असा एकूण ₹५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून नागरिकांनी मिरज पोलिसांचे कौतुक केले आहे.
घटनेचा तपशील
दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनाच्या प्रकरणातील आरोपींवर हल्ला करण्यासाठी काही तरुण आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून महात्मा गांधीचौक पोलिसांनी तात्काळ हालचाल करत, संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून चौकशी सुरू केली. अखेर चार तासांत या शस्त्रधारी टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
अटक आरोपी
1️⃣ वंश दिनकर वाली (वय २०, रा. दत्तनगर, पवनचक्कीजवळ, मिरज)
2️⃣ समर्थ संजय गायकवाड (वय २१, रा. हाडको कॉलनी, मिरज)
3️⃣ आकाश जगन्नाथ फोंडे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकर नगर, मिरज)
4️⃣ वैभव राजाराम आवळे (वय २८, रा. हाडको कॉलनी, मिरज)
5️⃣ सौरभ प्रसाद पोतदार (वय २३, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकर नगर, मिरज)
जप्त मुद्देमाल
एक गावठी पिस्तुल – ₹५०,०००
तीन जिवंत काडतुसे – ₹९००
एक लाकडी कोयता – ₹२००
एक मोबाईल फोन – ₹५००
एकूण किंमत : ₹५२,०००/-
दाखल गुन्हा गु.र.नं. २९१/२०२५
भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, २५
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३)/१३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी म्हणून राजेश अर्जुन गवळी (पोलीस हेडकॉन्स्टेबल क्र. १२०३) यांनी तक्रार दिली आहे.
कारवाईचे मार्गदर्शन व पथक
ही कारवाई मा. श्री. संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली),
श्रीमती कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक),
मा. श्री. प्रणिल गिल्डा (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग),
आणि मा. श्री. सतीश शिंदे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली,
सहा. पोलीस निरीक्षक संदीप रं. शिंदे (प्रभारी, महात्मा गांधीचौक पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, पोहेकॉ. अभिजीत पाटील, अभिजीत धनगर, सर्जेराव पवार, नाना चंदनशिवे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, मोहसीन टीनमेकर, साईनाथ पुजरवाड, राजेंद्र हारगे, तसेच पोउनि महादेव पवार, सपोफौ अनिल पैनापुरे, पोहेकॉ. अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, रोहन घस्ते, अनंत कुडाळकर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) यांनी सहभाग घेतला
नागरिकांचे कौतुक
मिरज सिव्हिल परिसरात संभाव्य गोंधळ आणि अनर्थ टळवून पोलिसांनी दाखवलेली दक्षता व तातडीने केलेली कारवाई ही प्रशंसनीय असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या कारवाईमुळे मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!