नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

माधवनगर सोनार दुकान चोरी प्रकरणाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; आरोपीकडून २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी :- रमजान मुलानी

सांगली :– माधवनगर परिसरातील सोनार दुकानातील चोरी प्रकरणाचा तपास संजयनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे (सो.), मा. अपर पोलीस अधीक्षक मा. कल्पना बारवकर (सो.) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा (अति. कार्यभार) यांच्या सूचनांनुसार तपास सुरू करण्यात आला होता. मा. पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने यातील आरोपीचा शोध घेतला. चोरीनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचा चेहरा आढळून आला, मात्र तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने त्याची ओळख पटविणे अवघड झाले. आरोपी सांगली शहरात नवखा असल्याने तपास अधिक क्लिष्ट झाला होता. दि. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोकॉ/२०६६ शशिकांत भोसले, पोकॉ/१३१ गायकवाड पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चिन्मय पार्क मिसळ कट्टा जवळ एक संशयित इसम थांबला आहे. पोलिसांना पाहताच तो इसम दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. पण पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याने आपले नाव राहुल जानराव सहारे (वय 23, रा. पिंपळगाव निपाणी, ता. नांदगाव खांदेश्वर, जि. अमरावती) असे सांगितले. विचारपूस केली असता त्याने आठ दिवसांपूर्वी माधवनगर मंगळवार पेठेत सोनार दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. पंच व सोनार यांच्या उपस्थितीत आरोपीची अंगझडती घेतली असता पिवळ्या धातूचे ६ गोल्ड फॉर्मिंग नेकलेस सापडले. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. १४/११/२०२५ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. कोठडीत आरोपीने सांगलीतील एका लॉजमध्ये राहिल्याची व तेथेच चोरीचे उर्वरित दागिने लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमाल फॉर्मिंग सोन्याचे दागिने – किंमत 58,500/- रुपये चोरीसाठी वापरलेली दुचाकी – किंमत 1,50,000/- रुपये मारतूल व सॅंग बॅग – किंमत 400/- रुपये एकूण मुद्देमाल–2,08,900/- रुपये या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/1279 संतोष पुजारी हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!