नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

६० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त
फरारी दोन साथीदारांचा शोध वेगात

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी राजेंद्र पवार

सांगली : टाकळी चौक परिसरात राबवलेल्या अचूक सापळा कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने जबरी चोरीतील सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे 26 सप्टेंबर रोजी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारा गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी पकडलेला आरोपी बारुद उर्फ अजित पवार (रा. सावळी) हा रेकॉर्डवरील आरोपी असून, LCB पथकाने मंगळवारी टाकळी चौकात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वयस्कर महिलेला चाकूचा धाक दाखवून मणी मंगळसूत्र व कर्णफुले लुटल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या गुन्ह्यातील त्याचे दोन साथीदार जिज्या काळे व लेंग्या त्रिश्या उर्फ त्रिशुल काळे हे फरारी असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगाने काम करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB चे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!