नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत अफू तस्करांवर गावभाग पोलिसांची मोठी कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- तालुका – हातकणंगले , मध्ये इचलकरंजीत मध्यप्रदेशातून अफू विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना गावभाग पोलिसांनी अटक करत मोठी कामगिरी केली. दिनेश मालवीया आणि संजय चौहान अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख ९२ हजार २४० रुपयांचा १ किलो ६८ ग्रॅम अफू, चारचाकी वाहन, दोन मोबाईल फोन आणि ५ हजार ९०० रुपये रोख असा एकूण ३ लाख १८ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

थोरात चौक परिसरात अफू विक्रीसाठी इसम येणार असल्याची माहिती मिळताच सोमवारी रात्री १० वाजता खवरे मार्केट कमानीजवळ सापळा रचून वाहन तपासणी करण्यात आली. त्यावेळी प्लास्टिक पिशवीत लपवलेला अफू आढळून आला. पोलीस शिपाई अमर शिरढोणे यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

आज न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईतून मध्यप्रदेशातून इचलकरंजीत अफूचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांनी परिसरात यापूर्वीही विक्री केली आहे का आणि या तस्करीत आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसां कडून सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!