DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा
साक्री : निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील खोरी गावाचे शिवारात दिनांक ११/११/२०२५ रोजी पहाटे ०३.३४. वाजेच्या सुमारास सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. ली. कंपनीचे टॉवर क्रमांक के-१० मधील २४० स्केअर एम.एम.ची ५४० मीटर एकुण ९४,५००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल चायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०२९१/२०२५ बीएनएस कलम ३०५,३३१ (४).३ (५) प्रमाणे दि.११/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी सार्कीदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी १) अनमोल अशोक भोसले रा. जामदा ता. साक्री जि. धुळे यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास दिनांक १२/११/२०२५ रोजी मा. न्यायालयाने सुरुवातीस ०४ दिवस व नंतर ०३ दिवस असे एकुण ०७ दिवस पोलीस कोठडी रिमांड मधे असताना तपासादरम्यान त्यांचेकडुन गुन्हा करतांना वापरलेली ईनोव्हा कार क्र.G.J-०६ DG-७८९२ सह इतर मुद्देमाल असा एकूण ६,२४,६००/- रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्याचेकडुन गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/ मयुर भामरे, सपोनि/ प्रियदर्शनी थोरात, पोउपनि यशवंत भामरे, पोहेको/नागेश्वर सोनवणे, पोहेको/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोहेकों/प्रशांत ठाकुर, पोहेकों/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/प्रवीण पवार, पोकों/सागर थाटशिंगारे, पोकों/दिपक महाले, पोकों/राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकों/पृथ्वीराज शिंदे, पोकों/सागर थाटसिंगारे, पोकों/सुजीत देवरे पोकों/कृष्णा मिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/सागर कांगणे, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मोहन माळी यांनी केली आहे.



