नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नर्सिंग कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; पिंपळनेरमध्ये खळबळ

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साकिब सैय्यद

धुळे : पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव निशा राया वळवी असून तिचे मूळ गाव अस्तंबा आहे. तिने एक महिन्यापूर्वीच पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
निशा या सामोडे रस्त्यालगत असलेल्या एका खासगी इमारतीतील होस्टेलमध्ये इतर विद्यार्थिनींसोबत राहत होती. मंगळवार रात्री सर्वजण झोपेत असताना, निशा बाथरूममध्ये गेली होती. आज सकाळच्या सुमारास एका विद्यार्थिनीने बाथरूमचा दरवाजा उघडला असता निशा ही खिडकीला दोराने लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
तिने तत्काळ होस्टेलच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत निशाचा मृतदेह खाली उतरवून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.
सकाळी मृत निशा वळवी यांच्या नातेवाईकांनी होस्टेलमध्ये दाखल होताच एकच आक्रोश उसळला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“घटनेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.”
घटनास्थळी प्रकल्प अधिकारी जोशना पाटील सह सहकारी उपस्थित असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!