नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सातारा अग्नीवीर आर्मी भरतीत बंजरंगबली करिअर अकॅडमीचा धमाका

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी — नारायण कांबळे

सातारा:- अग्नीवीर आर्मी भरतीच्या फिजिकल चाचण्यांत घालवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील बंजरंगबली करिअर अकॅडमीने पुन्हा एकदा झंझावाती कामगिरी करत भरती मैदान गाजवले. अकॅडमीतील १३ पैकी तब्बल १२ विद्यार्थ्यांनी रनिंगची अट उत्तीर्ण करीत यंदाच्या भरतीला दणदणीत सुरुवात दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी राज्यातील मोजकीच आणि शिरोळ तालुक्यातील एकमेव अकॅडमी म्हणून बंजरंगबली अकॅडमीची ओळख अधिकच भक्कम झाली आहे. दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी त्यांना मोफत प्रशिक्षण देत अनेक तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे काम ही अकॅडमी सातत्याने करत आहे.
या विक्रमी यशामागे प्रशिक्षक योगेश परिट सर यांचे शिस्तबद्ध, वैज्ञानिक आणि काटेकोर प्रशिक्षण तसेच अध्यक्ष तानाजी थोरवत यांच्या नेतृत्वाची प्रामाणिक मेहनत ठळकपणे जाणवते. तालुक्यात सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी म्हणून बंजरंगबलीने पुन्हा एकदा आपली दर्पोक्ती सिद्ध करीत स्पर्धकांसमोर नवा मापदंड उभा केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर घालवाड परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण असून पुढील टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“बंजरंगबली करिअर अकॅडमीने पुन्हा एकदा आपला धमाकेदार ठसा उमटवला आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:40 pm, April 18, 2026
35°C
छितरे हुए बादल
15 %
16 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Clouds: 29%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!