नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी महापालिका कंत्राटी कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी निवास गागडे

इचलकरंजी:- इचलकरंजी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगार कायदा 1971 प्रमाणे सहा ते सात कामगार काही वर्ष झाले काम करीत असून यापूर्वी 6 कंत्राटदार येऊन गेले पण त्यांनी त्या कामगारांना कामावरून कमी केले नाही. 1 नोव्हेंबर 2025 पासून जे नवीन कंत्राटदार आले आहेत. त्यांनी कायद्याचा उल्लंघन करून त्या कंत्राटी कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले असल्याने संघटनेतर्फे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील यांच्या मार्गदर्शनाने औद्योगिक न्यायालयात धाव घेण्यात आली. औद्योगिक न्यायालयाने कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू नये असा आदेश दिले असताना न्यायालयाचा अवमान करीत पाणीपुरवठा विभागातील सहा कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करून महापालिकेने कामगारांच्यावर अन्याय केलेला आहे. तसेच औद्योगिक न्यायालयात या कामगारांना किमान वेतन लागू व्हावा, प्रायव्हेट फंड आणि इ.एस. आय. विमा योजना लागू व्हावी व अनेक वर्षे काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे अशी याचिका दाखल केली आहे. त्यास न्यायालयाने अनुकूल प्रतिसाद दिलेला आहे. कायदा 1971 प्रमाणे ज्या परिसरात ज्या ठिकाणी आपण काम करतो ते मुख्य मालक असतात त्याप्रमाणे कंत्राटी सहा कामगार महापालिकेच्या अधिनियमानुसार महापालिकेचे विविध काम आहे त्यापैकी पाणीपुरवठा करणे, नागरिकांकडून पाणी पट्टी भरणा करणे हे पाणीपुरवठा संपूर्णपणे महापालिकेच्या हातात असून ते संपूर्ण काम महापालिका बघत असताना या कामगारांना आमच्याशी काहीही संबंध नाही असे म्हणणे बेकायदेशीर आहे. या अन्यायाला तोंड देण्यासाठी व आपला हक्क मागून घेण्यासाठी कायदेशीर रित्या दिनांक 19/11/20 रोजी पासुन महापालिकेच्या गेटवर आमरण उपोषण चालू केले आहे. कामगारांना कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला नसून सरळ सरळ न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आमरण उपोषणाला सुरुवात करून दोन दिवस झालेले असून अद्याप कोणतीही दाखल घेतलेली नाही. त्यामुळे सहा कंत्राटी कामगार बांधवांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 21/11/25 रोजी सकाळी दहा वाजता महापालिकेच्या गेटवर सर्व कंत्राटी कामगार काम बंद करून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!