नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड; निजामपुर पोलीसांची धडक कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा

साक्री :- निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पेटले गावाचे शिवारात दिनांक १६/११/२०२५ रोजी रात्री ०९.०० वाजेपासुन ते दिनांक १७/११/२०२५ रोजीचे पहाटे ०३.०० वाजेच्या दरम्यान सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.ली. कंपनीचे टॉवर क्रमांक के-१५२ मधील २४० व १८५ स्केअर एम.एम.ची २०० मीटर एकुण ७८,५००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०२९८/२०२५ बीएनएस कलम ३०५,३३१ (४), ३(५) प्रमाणे दि१७/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी १) प्रेमकुमार भाऊसाहेब बागुल वय-२४ वर्षे, २) विजय मिला बागुल वय १८ वर्षे ०८ महिने, ३) करण पिंटु माळचे वय-२० वर्षे सर्व रा. टिटाणे ता. साक्री जि. धुळे यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास दिनांक १८/११/२०२५ रोजी मा. न्यायालयाने सुरुवातीस ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मधे असताना तपासादरम्यान त्यांचेकडुन गुन्हा करतांना वापरलेली हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. MH-१८ S-८८६३ सह इतर कॉपरकेबल मुद्देमाल असा एकुण १,१८,५००/- रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/यशवंत भामरे, पोहेकॉ/नागेश्वर सोनवणे, पोहेकों/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोहेकॉ प्रशांत ठाकुर, पोहेकॉ/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/प्रवीण पवार, पोकों/सागर थाटशिंगारे, पोकों/राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकों/पृथ्वीराज शिंदे, पोकों/सुजीत देवरे पोकों/कृष्णा मिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मनोज देवरे, चापोकों/मोहन माळी यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!