नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजचा थरकाप उडवणारा हनी ट्रॅप! तरुणाला भावनिक जाळ्यात अडकवून मारहाण–लूट; 1.97 लाखांचे दागिने काढून घेतले

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज :- मिरज शहरात हनी ट्रॅपच्या नावाखाली तरुणाची निर्घृण लूट केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ओळख वाढवून फ्लॅटवर बोलावून तरुणाला धमकावणे, मारहाण करणे आणि दागिने हिसकावणे असा या टोळीचा अघोरी प्रकार असून, पीडित तरुणाने तडफडत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे.
पीडिताने सांगितले की, नुसरत शेख हिच्यासह मोहसिनी शेख, समीर कच्छी आणि रशिद सय्यद या टोळीने आधी भावनिक नातं जोडत जाळ्यात ओढले. नंतर फ्लॅटवर एकटे बोलावून अचानक साथीदारांनी धडक देत, “आमच्या बहीणीसोबत काय करत आहेस?” अशी आरडाओरड सुरू केली.
यानंतर अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून पीडिताकडील सोन्याची चेन आणि अंगठी मिळून तब्बल 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल काढून घेण्यात आला.
या टोळीने अशाच पद्धतीने अनेकांना जाळ्यात अडकवून फसवणूक केल्याची चर्चा असून, हनी ट्रॅपचे सावट मिरजेत वाढत असल्याचे बोलले जात आहे.
मिरज शहर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गंभीर गुन्ह्याची नोंद घेतली असून, आरोपींचा शोध मोहीम जोरात सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!