DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदीप सकट
चंदगड:- चंदगड तालुक्यातील दाटे गावाचे ग्रामदेवत श्री देव रवळनाथ, श्री लिंगदेव, श्री हनुमान, श्री लक्ष्मी देवी आणि श्री भावैश्वरी देवी यांच्या नूतन मंदिराचा वास्तूशांत, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण महोत्सव रविवार 23 नोव्हेंबर 2025 ते शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मोठ्या श्रद्धाभावाने होत आहे. या महोत्सवासाठी भक्तगण, गावकरी आणि परिसरातील सर्व मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक विधींसाठी श्री. श्री. 1008 सद्गुरू बाळयोगी महाराज, बेळूर यांच्या शुभाशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध दिवसांमध्ये वास्तूशांत, कलश स्थापना, विविध देवतांची पूजनविधी, हवन, महाप्रसाद, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवाचे प्रमुख कार्यक्रम 23 नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण, गणेश पूजन, नवग्रह शांती, वास्तुशांत हवन 24 ते 27 नोव्हेंबर रोजी विविध देवतांची विशेष पूजा, अभिषेक, कलश यात्रा, धार्मिक प्रवचने, कीर्तन कार्यक्रम 28 नोव्हेंबर मुख्य प्राणप्रतिष्ठापना, महापूजा, कलशारोहण आणि महाप्रसाद
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विविध समिती सदस्य आणि महिला मंडळांच्या सहभागामुळे सोहळा भव्यदिव्य पार पडणार आहे.समर्थ बनासोसेवा व श्री राम वेदज्ञान वर्ग यांच्यातर्फे विशेष आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर जिर्णोद्धार समिती, आयोजकांनी केले आहे.



